सोफ्टवेअर म्हणी
सोफ्टवेअर म्हणी
· एक ना code, भाराभर bugs
· code चांगला वाटला, म्हणून copy-paste करू नये
· मरावे परी bugs रूपी उरावे
· आपलाच code आणि आपलेच bugs
· आपला तो program, दुसऱ्याचं ते copy-paste
· इकडे code तिकडे release
· project आला होता, पण deadline आली नव्हती
· Engineer ची खोड lay-off शिवाय जात नाही
· अतीशहाणा त्याचा code रिकामा
· logic थोडे printfs फार
· Developer मागतो ’A’ rating, Manager देतो ’D’
· code कळला तरी bugs मिळत नाहीत
· bonus नको पण workload आवर
· स्वतः coding केल्याशिवाय output दिसत नाही
· दुसऱ्याच्या कोडातल्या warnings दिसतात, पण स्वतःच्या कोडातले errors दिसत नाहीत
· दिसतं तस नसतं म्हणूनच client फसतं
· जो Google वरती विसंबला, त्याची deadline बुडाली
· कुठे manager ची Honda-city आणि कुठे programmer ची activa
· इकडे keyboard तिकडे mouse
· promotion ही गेलं, increment ही गेलं, हाती आली pink-slip
· developer जातो जिवानिशी, manager म्हणतो आळशी
· release सरो, client मरो
· developer मेला workload ने आणि manager मेला tracking ने
· अडला manager, client चे पाय धरी
· developer ने डोळे मिटून code ढापला, म्हणून manager ला कळायचं राहत नाही
· code सलामत तो outputs पचास
· release गेला आणि bug-fix केला
· manager चा feedback, वाकडा ते वाकडाच
· manager पुढे दिली PPT, आणि कालची meeting बरी होती
· job सलामत, तो increments पचास
· fresher च्या program ला printf पासून तयारी
· deadline पाहून coding करावे
· उतावळा client, on-site posting
· उचलला phone आणि लावला कानाला
· बुडत्याला Google चा आधार
· ज्याचा लिहावा code, तो म्हणतो माझंच credit
· आलीया deadline, लिहावा program
· हपापाचा code गपापा
· मूर्ख manager पेक्षा शहाणा client बरा
· झाकला code सव्वाशे lines चा
· चार line चा code आणि बारा line च्या comments
· ज्याच्या हाती code, तोच programmer
· चार दिवस manager चे, चार दिवस developer चे
· कोडात नाही तर output कुठून येणार
· ऑफिसात राहून HR शी वैर करू नये
· ऐकावे manager चे, करावे client चे
· आयजीच्या code वर बायजी हुशार
· आधीच increment, त्यात profit sharing
· results झाकले म्हणून deadline यायची राहत नाही.
· reports मोठे, results खोटे
· programmer सोडून reviewer ला सुळी
· programmer च्या शापाने HR मरत नाही.
· manager चा cubicle असावा शेजारी
· intern ची धाव Google पर्यंत
· HR तारी त्याला कोण मारी
· हा code आणि हा client
· Google वाचून error गेला
· Google वरचा code, चालला तर चालला, नाहीतर delete केला
· error नाही त्याला डर कशाला?
· developer च्या मनात lay-off
· coding येईना hard-disk तोकडी
· code आहे तर compiler नाही, compiler आहे तर code नाही
· हातच्या printout ला laptop कशाला
· client ला manager साक्ष
· bug रामेश्वरी अन fix सोमेश्वरी
· लहान तोंडी मोठा seminar
· review चा code आणि release चा code वेगळा असतो
· project गेला आणि report राहिला
·